Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मी भाजपा सोडणार नाही : पंकजा मुंडे

maharashtra bjp leader pankaja munde file pic 1575197466

 

बीड (वृत्तसंस्था) मी पक्ष सोडणार या निव्वळ अफवा आहेत. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला. या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे मी खूप व्यथित आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपण भाजपा सोडणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पराभव झालेल्या भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी, १२ डिसेंबरला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी, आपण भविष्यातील वाटचालीबाबत बोलू या, अशी फेसबुक पोस्ट टाकल्याने पंकजा मुंडे या भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता स्वत: पंकजा मुंडेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, भाजप पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितलं. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. पक्षावर दबाव टाकण्यासाठी मी हे करत आहे, असा आरोप होत आहे. मात्र हे देखील सत्य नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version