Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा नगरपालिकेच्या विकासात हातभार लावेन – खा. उन्मेश पाटील

parola nager palika

पारोळा, प्रतिनिधी | येथील नगरपरिषदेच्या भरभराटीसाठी नगराध्यक्ष करण पवार आणि नगरसेवकांनी कंबर कसली आहे. शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेले अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. आगामी काळात या प्रस्तावांसह अधिकाधिक निधी खासदार नात्याने पालिकेच्या विकासासाठी मिळवून देऊ अशी ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज (दि.३०) येथे दिली.

 

येथील नगरपरिषदेला खासदार उन्मेश पाटील यांनी भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष करण पवार यांच्या दालनात त्यांचा पालिकेच्या नगरसेवकांनी सत्कार केला. याप्रसंगी मुख्याधिकारी विजय मुंढे, माजी नगराध्यक्ष जेष्ठ नेते सुरेंद्र बोहरा, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, नगरसेवक बापू महाजन, मनिष पाटील, नवल सोनवणे, दीपक अनुष्ठान, आशिष वाणी, गौरव बडगुजर, भैय्या चौधरी, कैलास पाटील, मंगेश कुंभार, महंमद खान, महंमद पठाण, प्रसाद महाजन, साहेबराव काळे, महावीर भंडारी, अनिल पाटील, पांडुरंग पाटील, दिनेश लोहार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग फागणे ते तरसोद काम लवकरच पूर्ण होईल. या ८५ किलोमीटरच्या प्रलंबित कामातील आर्थिक व तांत्रिक अडचणी दूर झाले आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत वर्षभरात या कामाला पूर्णविराम मिळेल, अशी ग्वाहीही खा. पाटील यांनी यावेळी दिली. गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचे काम मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जनशक्ती मंत्रालयात पाठ पुरावा सुरू आहे. एरंडोल-येवला या राज्य मार्गासाठी १३५ कोटी एरंडोल ते बहाळ या महामार्गासाठी १३५ कोटी रुपये मंजूर झालेले आहे. निविदा प्रक्रिया नंतर हे काम तात्काळ सुरू होईल. तसेच पारोळा तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या माध्यमातून तीन कोटी रुपये खर्चाचे महाळपुर येथे एक व उंदीरखेडे परिसरात दोन अशा तीन साठवण बंधाऱ्यासाठी निविदा निघाल्याची माहिती खा. पाटील यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार व नगरसेवक यांच्या गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात अतिशय चांगले काम पालिकेने केले असून आपल्या नगरसेवक सहकाऱ्यांना सोबत घेऊन ते प्रस्तावीत प्रकल्प पूर्ण करतील त्यासाठी माझा सदैव सहकार्य असून यापुढे देखील पालिकेच्या विकासासाठी हातभार लावेन. अशी भावना खा. पाटील यांनी व्यक्त केली. प्रास्ताविकात मुख्याधिकारी विजय मुंढे यांनी पालिकेच्या कामकाजाच्या आढावा सादर केला. नगराध्यक्ष करण पवार यांनी येत्या काळात शहराचा आणखीन भरीव विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Exit mobile version