Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हैदराबादच्या नामांतरावरून योगी व ओवेसींमध्ये जुंपली !

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनंतर याला एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे हैदराबादचे नामांतर वादाच्या भोवर्‍यात सापडल्यो दिसून येत आहे.

हैदराबाद येथील महापालिका निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उतारले आहे. यात योगींनी भाजप सत्तेवर आल्यास हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याची घोषणा केल्याने वातावरण तापले आहे. यानंतर योगी आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. ज्यांना हैदराबादचं नाव बदलायचंय, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पण तरीही हैदराबादचं नाव बदलणार नाही, अशा शब्दांत ओवेसींनी योगींवर पलटवार केला आहे. ज्यांना शहराचं नाव बदलायचंय, त्यांना आता जनतेनंच प्रत्युत्तर द्यायचंय, असं म्हणत ओवेसींनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ओवेसी म्हणाले की, भाजपनं या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावलंय की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू, असं आश्‍वासन देणार्‍या योगी आदित्यनाथ यांच्यावर ओवेसींनी जोरदार टीका केली. हैदराबादचं नाव बदलणं हेच भाजपचं लक्ष्य आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही, असं प्रत्युत्तर ओवेसींनी दिलं. यावेळी त्यांनी भाजपच्या तिकीट वाटपावरही निशाणा साधला.

Exit mobile version