Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हैदराबाद सामुहिक बलात्कार : चार आरोपींकडून धक्कादायक खुलासे

rape and muder mumbai

 

हैदराबाद (वृत्तसंस्था) तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यानुसार आरोपींनीच कट रचत मयत तरुणीची दुचाकी खराब केली होती. तसेच मदतीसाठी आरडा ओरडा करतांना कुणाला आवाज ऐकू नये म्हणून, तोंड दाबल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल आणून एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी तरुणीचा मृतदेह पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.

Exit mobile version