Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथील विवाहितेचा दिड लाखांसाठी पतीकडून शारीरिक छळ

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेला जळगावात राहणारे पती यांनी रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रूपये आणावे व तुला मुलीच होतात असे बोलून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडील आठ जणांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या मयनुनाबी शेख फिरोज (वय-२३) यांचे जळगावातील बिलालचौकात राहणाऱ्या शेख फिरोज शेख हनीफ यांच्याशी विवाह झालेला आहे. दरम्यान विवाहितेला दोन मुली असून पती शेख फिरोज हे रिक्षा चालवितात. पत्नीने माहेरहून नवीन रिक्षा घेण्यासाठी दीड लाख रूपये आणावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मारहाण करण्यास सुरूवात केली. पती-पत्नीच्या संसारवेलीवर दोन मुली झाल्या. तुला मुलीच कश्या होतात अशा आरोप करत पती शेख फिरोज, सासू शेख जुबेदा शेख हनीफ, जेठ शेख इकबाल शेख हनीफ, शेख हारून शेख हनीफ, काकू रईसाबी शेख सलीम, मोठी आई हमी दाबी शेख शब्बीर आणि जेठाणी अफसनाबी शेख हारून यांनी मानसिक व शारिरीक छळ केला व गेल्या ६ महिन्यांपासून विवाहितेला मोहरी पाठवून दिले. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी हे करीत आहे.

 

 

Exit mobile version