Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावर अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना  सकाळी घडली.

 

याबाबत माहिती अशी की,  गोपाळ कडू सोनवणे (वय-५५) रा. मुंजलवाडी ता. रावेर हे त्यांची पत्नी अनिता गोपाळ सोनवणे यांच्यासह दुचाकीने भुसावळ येथून मुंजलवाडी येथे बुधवारी २० एप्रिल रोजी सकाळी जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास  यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावरून जात असतांना त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत गोपाळ सोनवणे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी अनिता सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या.

 

जखमी महिलेस तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातातची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, स.फौ. हेमंत सांगळे, महेश वंजारी, किरण चाटे, यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे मुंजलवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version