Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीवर अत्याचार करणाऱ्या पतीला अटक; दुसरा फरारच

जळगाव प्रतिनिधी । स्वत:च्या फायद्यासाठी पत्नीवर मित्राच्या मदतीने अत्याचार करणाऱ्या पतीला रामानंदनगर पोलीसांनी आज सकाळी अटक‍ केली. तर दुसरा संशयित आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, जळगावातील व्यावयिकाने आपल्या पत्नीवर पतीसह त्याच्या मित्र संशयित आरोपी रमेश काकडे (रा. प्रल्हाद नगर, पिंप्राळ हुडको) यांच्या मदतीने अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर ‘ही घटना कुणालाही सांगू नको नाहीतर मुलांना ठार मारेल’ अशी धमकी पतीने दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पीडित विवाहितेला पतीने धुळे येथे माहेरी पाठवून दिले. दरम्यान, पिडीतेने आपबिती आपल्या आईवडीलांना कथन केले. हा प्रकार आईवडीलांच्या लक्षात आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पतीसह त्याचा मित्र रमेश काकडे यांच्या विरोधात पिडीतेच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे संशयित आरोपी फरार झाले आहे.

बसस्थानकातूक केली अटक
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मुख्य संशयित आरोपी पती हा जळगावातून पसार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोउनि संदीप परदेशी, तुषार विस्पुते, स्वप्निल निकुंभ, भुषण पाटील, रूपेश ठाकरे, विजय जाधव यांनी बसस्थानकातून मुख्य संशयित आरोपी पतीस आज सकाळी १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास अटक केली. तर दुसरा आरोपी रमेश काकडे अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

Exit mobile version