Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्याला चक्रीवादळाचा फटका; शेतकर्‍यांचे नुकसान

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम दहिगाव, हरीपुरा, मोहराळा शिवारात रात्री आलेल्या चक्रीवादळात शेतकर्‍यांच्या लाखो रुपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या बाबत मिळालेली माहीती अशी की काल दिनांक २६ एप्रील रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावखेडा सिम गावा लगतच्या मोहराळा शिवारात अचानक आलेल्या तुफानी वेगाने आलेल्या चक्रीवादळाने मोहराळा परिसरातील अनेक शेतकरर्‍यांची उभी केळी पडल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे. याच शिवारात यावल पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्ष गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या शेतातील सुमारे ९ हजार केळींचे खोडे उन्मळून पडल्याने त्यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावल तालुक्यात आदीच आजपर्यंतचे सर्व उच्चांक गाठुन ४५ अंश सेल्सीयसचे तापमान घाटले असुन त्यातच विहीरीतील जलपातळी घटल्यानेकेळी बागायत पिके धोकादायक वळणावर असतांना, काल रात्री अचानक आलेल्या या चक्रीवादळाने शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेली केळी पिके निसर्गाच्या फटक्याने जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी फार मोठया संकटात सापडला आहे. या संदर्भात अद्याप पर्यंत आधिकृतरित्या महसुल विभागाकडुन पंचनामे झाले नसल्याचे वृत्त आहे. या बाबत यावल महसूल विभागातुन मिळालेल्या माहीती नुसार नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी प्रस्तुत प्रतिनीधीशी बोलतांना सांगितले की आम्ही तात्काळ त्या क्षेत्रावरील मंडळ अधिकारी व तलाठी यांना सुचना दिल्या आहेत की त्यांनी ज्या ज्या शेतकर्‍यांच्या पिंकांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून दोन दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत पिक नुकासानीचा अहवाल सादर करावा. तर या परिसरातील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्यांच्यात निराशेची लाट पसरली आहे.

Exit mobile version