Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांदूरा येथे तळपत्या उन्हात श्रीराम पाटील यांच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारासाठी नांदुरा शहरातून प्रचार रॅली निघाली. येथील बस स्टॅन्ड जवळील पक्षाच्या प्रचार कार्यालयापासून रेल्वे स्थानक मार्गे शहराच्या प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी निघाली.
एका ट्रॅक्टरमध्ये उमेदवार श्रीराम पाटील, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, संतोष रायपुरे, डॉ. अरविंद कोलते, नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार, संतोष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, अरुण अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उमाकांत चौधरी, विनिता ताई गायकवाड, गजानन ठोसर, दिलीप भाऊ देशमुख, नरु शेठ नेहलानी, शाम भाऊ राठी, प्रा खर्चे सर, राजूभाऊ वाडेकर, नरेश शेळके, सोपान सेलकर, अतावूर रहमान जमादार, ऍड साहेबराव मोरे यांच्यासह सुमारे १३०० कार्यकर्ते महिलांसह प्रचार फेरीत उपस्थित होते. दुपारी बारा ते दोन दरम्यान अत्यंत कडक उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साहात तसूभरही कमी झाला नाही. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी श्रीराम पाटील यांच्यावर आणि प्रचार फेरीवर पुष्पवृष्टी केली आणि फटाके फोडून त्यांचे स्वागतही करण्यात आले.

Exit mobile version