Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅस लिक झाल्याने जळगावात भीषण आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावात दशक्रिया विधीचा कार्यक्रमात स्वयंपाक सुरू असताना गॅस लिक झाल्यामुळे भीषण आग लागून घराची राखरांगोळी झाल्याची घटना कांचन नगरात मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे.

सुभाष भाऊलाल बावीस्कर यांच्या शेजारी वृद्घाचे निधन झाले आहे. या वृद्घाचा आज दशक्रिया विधीचा आज कार्यक्रम आहे.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंपाक करण्यासाठी सुभाष बाविस्कर यांनी त्यांची खोली शेजारच्यांना दिली होती. स्वयंपाक सुरू असताना अचानक पणे गॅस लिक झाला व त्यामुळे अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी भीषण आग लागली. या भीषण आगीत खोलीत असलेले सर्व कपडे तसेच संसार उपयोगी साहित्य सर्व खाक झाले असून संसार उघड्यावर आला आहे.

घटनेची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. नागरिकांनी आपापल्या पद्धतीने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आटोक्यात आली नाही. महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब उशिराने पोहोचला . त्यामुळे आगीत संपूर्ण घर खाक झाल्याचा आरोप या आगीत नुकसान झालेल्या घराच्या मालकाने केला आहे. आगिबाबत माहिती देताना महिलेला अश्रू अनावर झाले होते.

सुभाष बाविस्कर हे सेंटिंग चे काम करतात अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना त्यात ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे बाविस्कर कुटुंबीय उघड्यावर आले असून शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे. या आगीत इतरही काही घरांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

Exit mobile version