Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात बारागाड्या आणि रथोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात सुमारे ११८ वर्षांची परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाच्या मिरवणूकीला आज मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली. हा रथोत्सवाला सुरूवात यावल शहरातील सरीता नदीपात्रातून सुरूवात करण्यात आली. याठिकाणी मोठा यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तर दुसरीकडे याच परिसरात खंडेराव महाराजांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला. यावेळी यात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली.

यावल शहरात रथोत्सव मोठ्या उत्सवाला सुरूवात करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता रथ हा शहरातील प्रताप नगरात दाखल झाला. त्यानंतर सायंकाळी खंडेराव महाराजांच्या बारागाड्याचा कार्यक्रम घेण्यात आला. रथोत्सवानिमित्त हरीता सरिता नदीपात्रात यात्रेचे आयोजन केले होते. बारगाड्या तसेच यात्रा पाहण्यासाठी शहरवासीयांची गर्दी उसळली होती. खंडेराव महाराजांच्या बारागाड्या तसेच यात्रा शांततेत पार पडली.

फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णासींग व पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर  यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, सपोनि विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठान यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक कर्मचारी दंगा नियंत्रण पथक व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त राखला.

यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, हाजी शब्बीरखान मोहम्मदखान, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते. शहराला लागुन असलेल्या हरिता सरीता नदीच्या पात्रातुन भक्ताने पारंपारीक पद्धतीने १२ गाड्या ओढल्यानंतर शहरातून रथ भ्रमणास सुरुवात झाली रथ भ्रमण रात्रभर सुरूच राहील, पहाटेच्या सुमारास रथयात्रेची सांगता होणार आहे. श्री बालाजी महाराज रथोत्सवाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले शहरवाशी शहरात परतले असून घरोघरी पाहुण्यांची वर्दळ ही आहे.

रात्री उशिरापर्यंत रथोत्सव शांततेत मार्गक्रमण करीत होते. शहरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मोठा मारुती सह चावडी जवळील हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर पंचायत समिती हनुमान मंदिर पालक नगर हनुमान मंदिर यासह शहरातील विविध हनुमान मंदिरात जन्मोत्सव उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सर्व मंदिरामधून भंडारे आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version