Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरीच तयार करा व्हर्जीन मोहितो मॉकटेल ! ( व्हिडीओ )

mojito mocktel by harshali chaudhari

जळगाव प्रतिनिधी । सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सर्वजण कासाविस झालेले असतांना सर्वांनाच गारेगार खावे-प्यावेसे वाटते. या पार्श्‍वभूमिवर, शेफ हर्षाली चौधरी आपल्याला विविध मॉकटेल्स कसे बनवितात ते सांगणार आहेत. यातील पहिल्या भागात पहा व्हर्जीन मोहितो मॉकटेलची माहिती.

कडाक्याच्या उन्हामुळे अगदी पारंपरीक दही, ताक, लस्सी व घरगुती सरबतांपासून ते विविध शीतपेये, आईसस्क्रीम आदींसह थंड पदार्थांना सर्वांची पसंती मिळत असते. यामुळे हॉटेल्स, आईसस्क्रीम पार्लर्ससह अगदी गाड्या, स्टॉल्स आदींवरील विके्रत्यांकडे गर्दी उसळते. तथापि, थोडे प्रयत्न केले तर आपणही घरच्या घरीच अतिशय उत्तमोत्तम शीत पदार्थ तयार करू शकतात. अलीकडे मॉकटेल्सचे विविध प्रकार लोकप्रिय झाले आहेत. यातील विविध मॉकटेल्स आपल्याला तयार करण्यासाठी खास जळगावातील ख्यातप्राप्त शेफ हर्षाली चौधरी या आपल्याला मदत करणार आहेत. याच्या पहिल्या भागात त्या व्हर्जीन मोहितो मॉकटेलबाबत माहिती देत आहेत. यात हर्षाली चौधरी यांच्या मदतीला आहेत बारटेंडर गोवी !

व्हर्जीन मोजिटो मॉकटेल तयार करण्यासाठी आपल्याला लिंबू, पुदीना, शुगर सिरप, बर्फाचे तुकडे आणि स्प्राईटची आवश्यकता आहे. याच्या पुढे नेमकी काय प्रक्रिया आहे ? हे आपल्याला सोबतच्या व्हिडीओवरून सहजपणे कळू शकते. आणि हो… याच प्रकारच्या विविध रेसिपीज जाणून घेण्यासाठी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला नियमीत भेट द्या.

पहा : व्हर्जीन मोहितो मॉकटेल तयार करण्याची पध्दत.

Exit mobile version