Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हॉस्पीटलसमोरून एकाची मोटारसायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हापेठ परिसरातील आशिर्वाद हॉस्पिटलसमोरुन चोरट्यांनी दुचाकी लांबविलीचे समोर आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणपती नगरातील रोटरी क्लबजवळ संदीप आत्माराम तंवर हे वास्तव्यास आहेत. १ जुलै रोजी रात्रीच्या वेळी ते जिल्हापेठ परिसरातील आशिर्वाद हॉस्पिटल येथे आले होते. यावेळी त्यांची (एमएच १९ डीए २८६८) या क्रमाकांची दुचाकी आशिर्वाद हॉस्पिटलसमोर उभी केली होती. काम आटोपून परतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी दिसून आली नाह. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न मिळाल्याने दोन दिवसानंतर संदीप तंवर यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version