Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस स्थानकाच्या लॉकअपमध्ये भीषण घटना : कैद्याचा करूण अंत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथील पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यात तसेच अमळनेर स्थानकाच्या लॉकअपमध्ये असलेल्या कैद्याने गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम भाऊलाल कुमावत या संशयिताला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत होता. त्याने रात्री गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

काही वेळातच ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संबंधीत व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला ? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेवटची माहिती आली तेव्हा जिल्हा पोलीस अधिक्षक सीएमव्ही महेश्‍वर रेड्डी हे अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. तर, या संदर्भात नोंद करण्याचे कामपोलीस स्थानकात सुरू होते.

Exit mobile version