होपने केल्या तीन कॅच: सुपर कोणती, जाणून घ्या.

 

hop ne

मुंबई प्रतिनिधी । लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019चा, आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विकेटकिपर शाई होपने घेतलेल्या कॅचची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात सुरु आहे. होपने या सामन्यात आतापर्यंत तीन कॅच घेतले आहेत. यापैकी सुपर कॅच नेमकी कोणती, ते जाणून घ्या.

या सामन्यात होपने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची जी कॅच पकडली, ती अफलातून अशीच होती. आंद्रे रसेलच्या सातव्या षटकात ख्वाजाच्या बॅटची कडा घेऊन चेंडू पहिल्या स्लीपच्या दिशेने जात होता. त्यावेळी होपने हवेत उडी मारत ही दमदार कॅच पकडली. ही अफलातून कॅच पाहून फलंदाजही हैराण झाले आहेत. थॉमसनं फिन्चला सहा धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कॉट्रेलनं डेव्हीड वॉर्नरचा अडथळा दूर केला. उस्मान ख्वाजा थोडा स्थिरस्थावर होत असतानाच, त्यामुळे ७.४ षटकांत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३८ अशी झाली. वेस्ट इंडिजने ‘मिशन वर्ल्ड कप’ला सुरुवात करताना पाकिस्तानला केवळ १०५ धावात गारद करीत ७ गड्यांनी विजय नोंदविला होता. या सामन्यात ओशाने थॉमसने २७ धावांत ४ गडी बाद केले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर ७ गड्यांनी विजय नोंदवला होता.

Add Comment

Protected Content