शिक्षक दिनी अमळनेर मतदारसंघातील शिक्षकांचा सन्मान

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनानिमित्त शिक्षक दिनी स्मितोदय फाऊंडेशनने अमळनेर विधानसभा मतदारसंघातील साऱ्याच शिक्षकांना पात्र समजून त्यांना सन्मानपत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.

स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा माजी आमदार तथा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ आणि सचिव तथा भाजयुमोच्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सदर सन्मान पत्र मतदारसंघातील सर्वच शासकीय,खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वृंदाना प्राप्त झाले असून या अनोख्या शुभेच्छाने शिक्षक वृंद सुखावले आहेत.

सदर उपक्रमाच्या संकल्पनेबाबत बोलताना स्मिता वाघ म्हणाल्या की, “लहानपणा पासूनच आपण सर्वच शिक्षक गुरूंचे कार्य आणि महिमा पाहत आलो असून या शिक्षकांमुळेच आपल्या अनेक पिढ्या घडत आल्या आहेत. आमच्या दृष्टिकोनातून जे विद्या दानाचे कार्य करतात. ते सारेच शिक्षक वंदनीय असून त्यांनी आजपर्यंत केलेल्या आदर्श कार्यातून उतराई होण्यासाठी आम्ही शिक्षक दिनाचे अवचित्य साधून सर्व गुरूंना वंदन करीत शुभेच्छा दिल्या असल्याचे स्मिता वाघ यांनी सांगितले.

सदर उपक्रम राबविण्यासाठी मच्छिन्द्र पाटील, सदाबापू पाटील, राहुल पाटील, घनश्याम पाटील, रविंद्र देशमुख, जितेंद्र साळुंखे, संजय पाटील, योगीराज चव्हाण, शिवाजी राजपूत, विलास सूर्यवंशी, रवींद्र पाटील, दौलत सोनवणे, हिरालाल पाटील, स्वप्निल पाटील, समाधान पाटील, कल्पेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भिकन पाटील, जयदीप पाटील, जगदीश पाटील, निखिल पाटील, निनाद जोशी, अमोल पाटील, पराग चौधरी आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

Protected Content