Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रा.डॉ.एस.एम.पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आदर्श कृषि शास्त्रज्ञ या गटांमधून डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालय जळगावचे प्राचार्य व कृषि शिक्षण परीसराचे संचालक प्रा. सुधाकर मधुकर पाटील यांना बांधावरील कृषि शास्त्रज्ञ असे संबोधून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रावेर येथे शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी हे ब्रिद असलेल्या साप्ताहीक कृषिसेवक च्या माध्यमातून कृष्णाजी पाटील व कुटूंबियांनी सात वर्षापूर्वी सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत गेल्या चार वर्षांपासून राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या वर्धापनदिनानिमित्‍त रविवार, २० फेब्रुवारी रोजी आदर्श कृषि शास्त्रज्ञ या गटांमधून डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालय जळगावचे प्राचार्य व कृषि शिक्षण परीसराचे संचालक प्रा. सुधाकर मधुकर पाटील यांना बांधावरील कृषि शास्त्रज्ञ असे संबोधून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते प्रा.सुधाकर पाटील यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरचे माजी आमदार व प्रगतिशिल शेतकरी मा.अरुण दादा पाटील हे होते तर उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील होत्या. जैन इरिगेशन सिस्टीमस्चे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील हे प्रमुख अतिथी होते. यावेळी कृषिसेवकचे संपादक कृष्णा पाटील, पत्रकार तुषार वाघुळदे, कृषि विभागाचे पदाधिकारी. नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष, केळी कामगार नेते तसेच परीसरातील वेगवेगळे अधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे चिरंजीव व तरूण सहकार्‍यांनी सहभाग दिला.

 

Exit mobile version