यावल येथे कांशीरामजी यांना अभिवादन

यावल प्रतिनिधी | डी. एस. फोर तसेच बामसेफ व बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीरामजी यांना पुण्यतिथीनिमित्त येथे आयोजीत एका कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.

यावल येथील बोरावल गेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात कांशीरामजी यांच्या परिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवुन आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी निळे निशाण संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर; रोजगार आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा शाखेचे तालुका अध्यक्ष विशाल तायडे, शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे, विष्णू भालेराव, कैलास लोहार, सेवानिवृत्त मुख्यध्यापक ए. के. तायडे, विष्णू लोखंडे, राजू अडकमोल, भरत अडकमोल, विवेक तायडे, अविनाश भास्कर, अशोक मच्चीवाले, किशोर अडकमोल, सागर गजरे, राहुल गजरे उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवर मंडळींचे आभार विलास भास्कर यांनी मानले.

Protected Content