Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांना श्रध्दांजली

ganesh rana shraddhanjali

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गणेश राणा यांना एका कार्यक्रमात सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महानगर शिवसेनेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार एस.पी. कुलकर्णी, जिल्हा संघटक जळकेकर महाराज, अ‍ॅड. गोविंद तिवारी, उल्हास साबळे, संजय निकुंभ, सुनील माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार राजूमामा भोळे, चंद्रकांत खैरे, जयप्रकाश बाविस्कर, संपर्कप्रमुख संजय सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील यांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले. या शोकसभेला शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, संघटक दिनेश जगताप, राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, विपिन पवार, जितेंद्र गवळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version