Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे भाजपाच्या वतीने विज बिलांची होळी; महाविकास आघाडीचा केला निषेध

पारोळा प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात विजबिल माफ करण्याचा शब्द निर्णय ठाकरे सरकारने पुर्ण न केल्याचा निषेधार्थ आज पारोळा येथील नगरपालिकेच्या चौकात महाविकास आघाडीच्या निषेधार्थ विजबिल होळी आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी तालुका भाजपा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करित सांगितले कि, नाकर्त्या राज्य सरकारने जनतेचा विस्वास घात केला आहे, आगोदर लाकडॉऊन काळातील विज बिल माफ करण्याचे आश्वासन देत नंतर मात्र आपला शब्द फिरवित कोणतेही विज बिल माफ होणार नाही. असे म्हणुन जनते चा विस्वास घात केला म्हणुन पारोळा तालुका भाजपाच्या वतीने आज विज बिलांची होळी करून राज्य सरकार चा निषेध व्यक्त करित केला.

मार्च महिण्यापासुन राज्यात लॉकडाऊन होते ते हळुहळु आगस्ट महिन्या पासुन उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु मार्च ते जुलै महिन्यापर्यंत साधरण पाच महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. कोणतेच उत्पनाचे क्षेत्र नव्हते म्हणुन भाजपाच्या वतीने या पाच महिण्याच्या कालावधीचे लाईट बिल माफ करावे म्हणुन राज्यभर आंदोलने करित आहोत. म्हणून आज राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून या लाईट बिलांची होळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपा पारोळा सरचिटणीस सचिन गुजराथी, पारोळा तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष केशव क्षत्रिय, रविंद्र पाटील, धिरज महाजन, नरेंद्र राजपुत, विनोद हिंदुजा, अनिल टोळकर, गोपाल दाणेज, सुनिल भालेराव, समिर वैद्य, संकेत दाणेज, शाम पाटील, गणेश क्षत्रिय, भिकन पाटील, नरेंद्र साळी, कैलास चौधरी,गोटु वाणी, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version