Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंनिस अमळनेर शाखेची रंगली पर्यावरण पूरक होळी

.jpg

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर, एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, स्व. पी.एन.मुंदडा माध्यमिक विद्यालय, आणि स्व. श्री एम. एस. मुंदडा माध्यमिक विद्यालय शाळेत अंधश्रद्धा निर्मुलन समिती अमळनेर शाखेच्या वतीने पर्यावरण पूरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी रासायनिक खतांचा शेतीसाठी केला जाणारा अतिवापर, भ्रष्टाचार, हुंडाबळी, अस्वच्छता, धूम्रपान, मद्यपान, वाढती गुन्हेगारी, धर्मांधता, अंधश्रद्धा, बलात्कार, खून, चोऱ्या, पाण्याचा अतिप्रमाणात गैरवापर, वृक्षतोड, जंगलाची नासधूस, इत्यादी सामाजिक वाईट प्रथां वीरोधात होळीसाठी तयार केलेले फलक आणि सर्व शालेय विध्यार्थ्यांनी शालेय परिसरातील गोळा केलेला कचरा होळीसाठी वापरण्यात आला.

सदर प्रसंगी बुवाबाजी संघर्ष प्रमुख सुनील वाघमोडे यांनी सर्व वाक्यांची माहिती आणि महत्त्व पटवून दिले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी होळी पेटवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर कार्याध्यक्ष डॉ. दिनेश पाटील यांनी होळीसाठी अर्पण केलेले अन्न हे जळून नष्ट होते तरी आपण ते गोड अन्न होळीच्या ठिकाणी जमा करून आपल्या भागातील गोरगरीबांना दान करा ! म्हणजे तेही आनंदित होतील. त्यानंतर सचिव डॉ. उदयकुमार खैरनार यांनीही आजचा विध्यार्थी हा उद्याचा परिवर्तनकाळ आहे . म्हणून त्यांनाच आधी योग्य दिशा दिली तर त्यांची भविष्यात त्यांच्या जिवनाची दशा होणार नाही. सदरच्या कार्यक्रमास अंनिस कार्यकर्ते डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. हिम्मत पाटील, प्रवीण पाटील, शरद खैरनार, अमोल राजपूत, डी.ए. सोनवणे, आणि विपुल गारमेंटचे कुंदनानी शेठ आदी उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक संदीप पवार, सुनील पाटील, नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक डी.एन. पाटील, सागर महाजन, पी.एम. ठाकरे, व्ही.डी. पाटील, पी.ए. शेलकर, ए.पी. जाधव, एम.एस. पाटील, बी.ए. देशमुख, वाय.जे.पाटील, सी. एस. पवार, एच. एम. पाटील, आर. एस. पाटील, बी. बी. पाटील, एस.एच. पवार,किशोर पाटील, धनराज महाजन, स्वाती पाटील, कीर्ती सोनार,वंदना पाटील, रोहिनी ताडे, अर्चना महाजन, भारती चव्हाण, वंदना जाधव, छाया निकम, सुषमा तेले, रुपाली भामरे, रुपाली महाजन, अशोक सैनदाने, राहुल पाटील, धर्मेंद्र पाटील, अनिल माळी , दिलीप माळी, दिलीप चव्हाण, दीपक पाटील, आदी सर्व मिळून अशा या दुर्गुणांची होळी साजरी करून आपणही अशाच प्रकारची होळी साजरी करावी असे अंनिस शाखेच्या वतीने आवाहन करण्यात आले.

Exit mobile version