Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकूर समाजातर्फे होलिकोत्सव साजरा

अमळनेर प्रतिनिधी । येथिल ठाकूर जमातीच्या वतीने शिमगा उत्सवास आज होळीला अग्नी देऊन सुरवात झाली आहे.

ठाकूर जमातीचा प्रमुख सण म्हणून पारंपरिक पद्धतीने होळी मोठ्या उत्साहात ठाकूर समाजाने सामूहिकपणे एकत्र येत होळी रे होळी च्या जल्लोषात साजरी केली. पाच दिवस चालणार्‍या शिमगा उत्सवाची सुरवात लहान होळीच्या जागेवर पौर्णिमेला मोठी होळी रचून करतात.जमातीचे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे ,जमात प्रमुख दिलीप ठाकूर व जेष्ठ पंच नारायण वानखेडे यांनी उंबराच्या दांडा मध्यभागी उभा करीत होळी रचायचा शुभारंभ केला. रंगबिरंगी पताका, फुगे, पुष्पहार लावून होळी सजवण्यात आली होती.

होळीच्या उत्सवासाठी जमलेल्या समाजाला रणजित शिंदे यांनी संबोधित करतांना ,सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक एकतेची संस्कृती जपण्यासाठी एकत्रित उत्सव साजरे करणे गरजेचे आहे असे आवाहन केले. जमातीचे प्रमुख दिलीप ठाकूर यांनी सौ.हिराबाई ठाकूर यांचेसह हारडा कंगन विधिवत अर्पण करून सपत्निक पूजा केली. तर रणजित शिंदे,सरचिटणीस प्रकाश वाघ, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष संजय ठाकूर, युवाप्रमुख गुणवंत वाघ महिला प्रमुख मिनाबाई ठाकूर, सरलाबाई ठाकूर, बेबीबाई वानखेडे,महिला कार्यकर्त्या अपेक्षा पवार, मंगलताई ठाकूर, आदिं प्रमुख पदाधिकार्‍यांनी एकत्रित पूजा अर्पण करून होळीला अग्नी दिला. याप्रसंगी डॉ.तेजस ठाकूर याने अपंगत्वावर मात करून एम.डी.चे शिक्षण उच्च गुणवत्तेने यशस्वी केले यासाठी डॉ.तेजस चे माता पिता दिलीप वानखेडे, सौ.पुष्पा वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. तर राज्यसरचितणिस पदी निवड झाल्याबद्दल रणजित शिंदे यांचाही सामूहिक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ.कौस्तुभ ठाकूर, डॉ.श्रध्दा ठाकूर, राजेंद्र ठाकूर,संजय सूर्यवंशी, सरलाताई जाधव, शोभाबाई वानखेडे,मनिषा ठाकूर, जयश्री वानखेडे, यांचेसह उमेश ठाकूर, अनिल ठाकूर, वामनराव चव्हाण,प्रकाश वानखेडे, कुणाल ठाकूर, निलेश वाघ, जाधव,उमाकांत ठाकूर,गजानन ठाकूर,अजय ठाकूर,सचिन ठाकूर,दिलीप सैंदाने तसेच पोपटराव सुर्यवंशी,सोमाजी ठाकूर,नारायण ठाकूर, यांचेसह प्रविण ठाकूर, रविंद्र वानखेडे ,मनोज ठाकूर,अंगतराव जाधव, चंद्रकांत वानखेडे, हिम्मतराव सूर्यवंशी,सुरेश ठाकूर, अशोक वानखेडे , रमेश सैंदाणे, दृष्यंत ठाकूर, कु.गुंजन ठाकूर, कु.ऊर्मिला ठाकूर आदिंनीही यावेळी उपस्थिती देत शिमगा उत्सवात सामूहिक सहभाग घेतला.

Exit mobile version