Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी स्पर्धा

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकार आणि जळगाव हॉकीच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हॉकी स्पर्धा घेण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी तर  खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन जगदीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रीय खेळाडू सागर टेकावडे यांची खास उपस्थिती होती.

ष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चार गटात हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात पुरुष, महिला व लहान मुलं या चार घटकांचा समावेश होता. पुरुषांच्या गटात अंतिम फेरीत ध्यानचंद अकॅडमी ने विझार्ड स्पोर्ट्स अकॅडमी चा २-१ ने  पराभव केला. महिला गटात अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालयाच्या वरिष्ठ गटाने कनिष्ठ महाविद्यालयाचा ३-० ने पराभव केला

विद्या इंग्लिश ने ध्यानचंद बी संघाचा १-० ने पराभव केला. अँग्लो उर्दू ने हॉकी जळगाव चा २-० ने पराभव केला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, फारुक शेख, इकबाल मिर्झा,वर्षा सोनवणे, सत्यनारायण पवार, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, मार्गदर्शक सुजाता गुल्हाने, मीनल थोरात, प्रवीण ठाकरे , निलेश पाटील, अब्दुल मोहसीन, वाल्मीक पाटील, प्रा. छाया चिरमाडे, मुजफ्फर शेख व पोलीस हॉकी प्रमुख शादाब सैयद यांची उपस्थित होती.

Exit mobile version