वाळू माफियांना दणका : वेगवेगळ्या कारवाईत वाळूचे डंपर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वेगवेगळ्या भागात वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपरांवर धडक कारवाई करण्यात आली असून डंपर पोलीसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी शनीपेठ, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील भिलपूरा चौकात रात्री पोलीस कर्मचारी गस्तिवर असतांना डंपर क्रमांक (एमएच १९ सी ३४२२ ) मधून वाळूची चोरटी वाहतूक करतांना पोलीसांनी पकडले. या कारवाईक डंपर चालक शेख रहीम शेख रऊफ (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव यांच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दुसऱ्या कारवाईत आकाशवाणी चौकातून ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारासे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना विनाकंमांकाचे तीन डंपरमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक करतांना पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानुसार पोलीसांनी वाहने जप्त केली आहे. आपण वाचत आहात लाईव्ह ट्रेंडस न्यूज याप्रकरणी पोहेकॉ फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून देविदास नवल रायसिंग रा. बांभोरी ता. धरणगाव, प्रमोद भिमराव नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव, सतिष लक्ष्मण महाजन रा. शनीपेठ, संतोष शालक नन्नवरे रा. बांभोरी, आणि ज्ञानेश्वर श्रावण नन्नवरे रा. जळगाव या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तर तिसऱ्या कारवाईत शहरातील शिवकॉलनी स्टॉप जवळील राष्ट्रीय महामार्गावर रामानंदनगर पोलीसांनी धडक कारवाई करत वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ सीवाय ५९१५) पकडले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसतांना आढळून आले आहे. पोलीसांनी वाळूचे जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितेश बच्छाव यांच्या फिर्यादीवरून सैय्यद अशफाक सैय्यद शफी रा. आव्हाणे ता.जि.जळगाव आणि अभय हरी परदेशी रा. भडगाव जि.जळगाव या दोन्ही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास महाजन करीत आहे.

Protected Content