Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विश्वविक्रम मोडत कमलाबाई भुतडा यांनी रचला इतिहास

बुलढाणा प्रतिनिधी । विक्रम करण्यासाठी वेगळीच चिकाटी, जिद्द आणि जोश असतो. असेच काहीसे एका ७२ वर्षीय महिलेने करुन दाखवले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कमलाबाई भुतडा यांनी ४ लाख २० हजार वेळा “विठ्ठल विठ्ठल” लिहून विश्वविक्रम केला आहे. यामुळे कमलाबाईचे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविला गेले आहे.

छंदासाठी वय किंवा कोणतीही अट नसते, पण काही लोक नकळत आपला छंद पूर्ण करून आपले नाव अजरामर करून घेतात, त्यापैकीच एक म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कमलाबाई भुतडा. कमळाबाई भुतडा यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड असल्याने त्या नेहमीच धार्मिक कार्यात सहभागी होतात. त्यामुळे फावल्या वेळात त्यांना विठ्ठल विठ्ठल नाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे पुस्तक लिहिण्याची आवड निर्माण झाली.

जानेवारी 2016 ते जून 2021 या कालावधीत त्यांनी 4 लाख 20 हजार वेळा विठ्ठल विठ्ठल हे नाव लिहून नवीन विक्रम केला. तसेच 2021 मध्ये त्यांनी ओम नमो भगवते हा मंत्र 2 लाख 20 हजार वेळा लिहिला, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून वयाच्या ७२ व्या वर्षी हा अनोखा विश्वविक्रम केल्याने जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, मुरलीधर भुतडा, अभिनव महाविद्यालय, चिखलीचे अध्यक्ष व पिंपरी गवळी जवळील कोळी गवळी येथील महाबळेश्वर बाबांचे भक्त यांच्या त्या मातोश्री आहेत.

 

Exit mobile version