Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना योध्दांना कायमस्वरूपी सेवेत घ्या; जनक्रांती माेर्चाची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना योध्द्यांना सरकारी सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करा आणि मयत झालेल्या कोरोना योध्द्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांनाही सेवेत करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येवून मागण्यांचे निवेदन करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोना मोठ्या प्रमाणावर झाला. यात महाराष्ट्र राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला. कोरोनाची  बाधा झालेल्या रुग्णाकडे जवळचे नातेवाईक सुद्धा जात नव्हते. अशा परिस्थितीत शासनाने शासकीय रुग्णालयात कोवीड सेंटर येथे कंत्राटी स्वरूपात डॉक्टर, नर्स, कक्षसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगारांची नियुक्ती केली होती. या कंत्राटी कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा निस्वार्थ पणे केली. यामुळे राज्यात करुणाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोनाची पहिली व दुसरी लाटे ओरताच शासनाचे शासकीय शासकीय रुग्णालयात कोरोना काळात काम करणार्‍या कंत्राटी कामगारांना कमी केले आहे. वास्तविक राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. या रिक्तपदावर कोरोना काळात रुग्णांची सेवा करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्यात यावे. या मागणीसाठी आज मंगळवार १४ सप्टेंबर रोजी ११.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र जनक क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान जागर समितीचे संयोजक भरत ससाणे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष नीलेश बोरा, सुरेश तायडे, छावा  मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, संविधान जागर समितीचे सरचिटणीस साहेबराव वानखेडे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे उपाध्यक्ष चंदन बिऱ्हाडे, रमेश सोनवणे, फईम पटेल, संजय सपकाळे, कृष्ण सपकाळे, सागर चौधरी, जुगल जावळे, हर्षल देवकर, खुशाल सपकाळे, रमेश वानखेडे, भाग्यश्री चौधरी, ऐश्वर्या सपकाळे, मंदाकनी विंचुरकर, प्रतीक्षा सोनवणे, नंदा पाटील, फरिदा तडवी ,ललिता पवार, महेश खर्चाणे, बापूसाहेब पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते

 

Exit mobile version