Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणे येथे सेवानिवृत्ती समारंभ; युवानेते मंगेश चव्हाणांकडून दाम्पत्याचा सत्कार

mangesh chavhan

चाळीसगाव प्रतिनिधी । हिंगोणे येथे नुकताच सेवानिवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी युवानेते मंगेश चव्हाण यांनी दाम्पत्याचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिला.

याबाबत माहिती अशी की, हिंगोणेमधील राजाराम मार्तंड चव्हाण हे भारतीय सैन्य दलातून २४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहे. याप्रसंगी युवानेते मंगेश चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. तसेच चव्हाण यांनी राजाराम यांना शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देत सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवारासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Exit mobile version