Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात नुकतेच विविध येथे डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले तर इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे.

या शिबिरात एकूण ८० रुग्णांच्या डोळयांची तपासणी करण्यात आली तर यातील ०९ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.

यावेळी सागर महाजम उर्फ शामभाऊ व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला या वेळी डॉ कुंदन फेगडे यांच्या मध्यमातून जास्तीत जास्त जनसेवा व रुग्ण सेवा व्हावी व जनतेची सेवा त्यांच्या व मित्रपरिवाराच्या मध्येमातून या पुढे ही होत राहावी अशी प्रार्थना सागर महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केली.

संपूर्ण मित्र परिवाराचे गावाच्या वतीने आभार व्यक्त केले व आता पर्यंत २६ शिबीर हे आमच्या डॉ. कुंदनदादा फेगडे मित्र परिवाराच्या सहकार्याने यावल तालुक्यात घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विविध कार्यकारीसहकारी सोसायटी चे चेअरमन सागर महाजन होते, तर कार्यक्रमाचे उद्धघाटन व्हा चेअरमन संतोष सावळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले.

या प्रसंगी हिंगोणा ग्रामपंचायतचे सरपंच फिरोज तडवी विकसो चेअरमन सागर महाजन उर्फ शामभाऊ व्हाईस चेअरमन संतोष सावळे, संचालक विष्णू महाजन , मनोज वायकोळे,सचिव विजयसिंह पाटील, सुभाष गाजरे चंद्रकांत महाजन युवराज गाजरे , हर्षल धनगर, भगवान पाटील , तुषार कोळी, हरेश भोळे , गौरव बाविस्करआदींची उपस्थिती होती.

या शिबिरासाठी सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, रितेश बारी, कुंदन फेगडे मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version