Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा येथे तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बाप-मुलावर खूनाचा गुन्हा

Crime 21

फैजपूर, प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून हिंगोणा येथील तरूणाला पितापुत्रांनी मारहाण करत जखमी केले होते. जखमी झालेल्या तरूणाला उचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पितापुत्रांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयताच्या आईने तक्रार दिल्यावरून सुभाष देवीदास पाटील व सोनल सुभाष पाटील दोघ (रा.हिंगोणा) या पितापुत्रांनी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हिंगोणा येथे दिनांक सात रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नितीन बाविस्कर या तरुणाने संशयित आरोपी यांच्या घरा त्यासमोर केरकचरा व जेवणाची उष्टी ताटली. तसेच दारू खोक्याचा पुठ्ठा का टाकला. या किरकोळ कारणावरून सुभाष पाटील व सोनल पाटील या पिता-पुत्रांनी नितीन यास शिवीगाळ करून त्याला लाकडी दांडक्याने डोक्यावर मारून दुखापत केली त्यात तो गंभीर जखमी झाला असता त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यात तो मरण पावला. या घटनेप्रकरणी मयताची आई गीताबाई पांडुरंग बाविस्कर यांनी फैजपूर पोलिसात रविवारी तक्रार दिल्यावरून सुभाष पाटील व सोनल पाटील या पिता-पुत्रांनी विरुद्ध कलम 302, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश वानखेडे व सहकारी करीत आहे.

Exit mobile version