Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा येथे दादाजी धुनीवाले पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत

hingona nivad

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील दादाजी धुनीवाले पायी दिंडीचे हिंगोणा येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पायी दिंडीचा पहिला मुक्काम हिंगोणा येथेच राहणार आहे.

हिंगोणा येथील जय श्री दादाजी मित्र मंडळातर्फे श्री. श्री.१००८ धुनी वाले दिंडी प्रमुख अधिकारी भोलानंद सरकार दरबारची पायी दिंडीचे पूजन करण्यात आले. सदरचे पायी दिंडी वारीचे हे 27 वे वर्ष असून ही दिंडी थोरागव्हान ते खंडवा हे अंतर 150 किमीचे अंतर पायी वारीने दरवर्षी पार पाडले जाते. यात एकूण 5 मुक्काम केले जातात. हिंगोणा विवरा, लोणी, बोरगाव आणि खंडवा असे मुक्काम केले जाते. यातील पायी दिंडीचा पहिला मुक्काम हिंगोणा येथे जय श्री दादाजी मित्र मंडळ मार्फत करण्यात आला.

मंडळामार्फत जय श्री दादाजीच्या प्रतिमा पूजन व पायी दिंडीचे पूजन करून त्यांची निवास व भोजन व्यवस्था हिंगोणा गावामध्ये श्री दादाजी मित्र मंडळातर्फ हटकर कॉलनीत करण्यात आली. दिंडीत पुरुष व महिला भक्त ह सहभागी आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी चहा फराळचा कार्यक्रम सकाळी ७ वाजता आटोपल्यानंतर दिंडी ही पुढील मुक्कामाच्या विवरा ह्या गावच्या दिशेने मार्गस्त होणार आहे. यशस्वितेसाठी जय श्री दादाजी मंडळाचे कार्यकर्ते किरण पाटील, मंगल पाटील, किशोर पाटील, निलेश पाटील, विनोद पाटील, गणेश पाटील, संकेत चौधरी, सुरज पाटील, जितू पाटील, भगवान पाटील आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Exit mobile version