Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन’ : आरोग्यसेवकांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी | ‘जळगाव बिल्डींग पेंटर वेलफेअर असोसिएशन’ संचलित ‘हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन’तर्फे जिल्हा आरोग्यसेवक पदी सैफूदिन पेंटर यांची व शहर आरोग्यसेवक पदी खलील शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

‘जळगाव बिल्डींग पेंटर वेलफेअर असोसिएशन’ संचलित ‘हिंदू मुस्लिम एकता बिल्डिंग पेंटर वेलफेअर असोसिएशन’तर्फे आज जिला अध्यक्ष इस्माईल खान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्यसेवक पदी सैफूदिन पेंटर यांची व शहर आरोग्यसेवक पदी खलील शहा यांची नियुक्ती करण्यात आली.

जलगाव जिल्ह्यात सर्व पेंटर बांधवांकडून या आरोग्यसेवकांच्या माध्यमातून ‘जळगाव सरकारी हॉस्पिटल किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये मदत करण्यात येईल. असे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इस्माईल खान, जिल्हा सल्लागार अकिल बाबा, मार्गदर्शक दगडू शहा, संदिप कुमावत, गणेश प्रजापती, अकिल खान, जिल्हा संपर्क प्रमुख अहमद खान, उप सचिव अलताफ खान, रोशन शहा यांची उपस्थिती होती.

Exit mobile version