Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आगामी सण हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकोप्याने साजरे करा – पो.नि. सुनिल पवार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोघेही हिंदू व मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी येत असल्यामुळे शांतता कमिटीच्या बैठकीत मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद सण २९ सप्टेंबर रोजी  साजरा करणार आहे तर  २८ सप्टेंबर रोजी  अनंत चतुर्दशी दिवशी हिंदू बांधव श्री गणरायाचे विसर्जन करणार असल्याचे एकमत शांतता कमिटीत झाल्याने पारोळ्यात दोघी सण एकोप्याने साजरे होणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले.

पारोळा पोलीस ठाण्याच्या आवारात हिंदू व मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत हिंदू धर्माचे प्रमुख कार्यकर्ते तसेच मुस्लिम इमाम मौलाना प्रतिष्ठित व्यक्ती व शांतता कमिटीचे सदस्यासह पत्रकार  उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार म्हणाले की, तारीख 14 सप्टेंबर पासून विविध सणांना सुरुवात होत आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच जातीय सलोखा टिकावा व जिल्ह्यात पारंपारिक पद्धतीने तालुक्यात होणारे सण उत्सव शांततेच्या मार्गाने सुरळीत पार पडण्यासाठी जी हिंदू- मुस्लिम बांधवांनी परंपरा अबाधित ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर  एकोप्याने सण उत्सव साजरे करावे . असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

दरम्यान सण उत्सवात धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत शांततेचे वातावरण कसे राहील याबाबत सर्वांनी सामूहिक जबाबदाऱ्याने उत्सव साजरे करावे

असे लोक दर्पण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगतात सांगितले. दरम्यान सण उत्सव काळात कायद्याचे पालन करावे, जे कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिलेत यावेळी हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी शहरातील आजवरचा इतिहास सांगत येणारे सण उत्सव एकोप्याने साजरे करत शांततेचे वातावरण ठेवून असे आश्वासन यावेळी बैठकीत दिलेत.

Exit mobile version