Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगोणा येथे महिला मोर्चेकऱ्यांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप

WhatsApp Image 2019 05 10 at 1.33.32 PM

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा ग्राम पंचायतीच्या माध्यमातुन मागील चार महीन्यापासुन गावावर पिण्याच्या मोठे संकट निर्माण झाले असून आज या पाण्याच्या ग्रासलेल्या ग्रामस्थांचा राग अनावर होऊन त्यांनी सकाळीच मोर्चा आणून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले व प्रशासक बसवा अशी मागणी केली.

 

सध्या मे महिना सुरू असून उन्हाच्या तीव्रतेत भरपूर वाढ झाल्याने परिसरातील विहिरींच्या जलपातळीत झपाट्याने घट होत आहे. याचा फटका शेतकरी व गावातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी केळी बाग फेकून दिले आहे. तर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी हे तब्बल ४० ते ४५ दिवसांनी मिळत आहे. याचाच उद्रेक म्हणून आज शुक्रवार १० मे रोजी सकाळी १० वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर पाणी मोर्चा आणत संताप व्यक्त केला.

आज ग्रामपंचायत कार्यालयात पाणी टंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा असल्याने सभा सुरु होण्या अगोदरच गावातील महिलांचा मोर्चा आल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली. त्यामुळे ही सभा होऊ शकली नाही. .गावापासून ७ किमी अंतरावर असलेले मोर मध्यम प्रकल्प यांचा गावाला काडीमात्र फायदा नाही. तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत अंदाजीत ४७ लक्ष रुपये एवढा निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी त्यात ट्युबवेल व विहीर यांचा समावेश नसल्याने योजनेचा ग्रामस्थाना प्रत्यक्ष लाभ झालाच नाही. एकीकडे गावावर जलसंकट ओढवलेले असताना अज्ञात माथेफिरुने गावातील गावातील मुख्य जलवाहिनी फोडून टाकली आहे. यामुळे गावकऱ्यांना ४० ते ४५ दिवसांनी मिळणाऱ्या पाण्यास मुकावे लागले आहे.

गावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडले आहे
– आर. ई. चौधरी , ग्रामविकास अधिकारी

गावातील भीषण पाणीटंचाई बघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरीची पाहणी करून यावल येथील तहसीलदार यांना दिनांक ६ रोजी झालेल्या बैठकीत ८ विहीरी अधिग्रहण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
– डी. एच. गवई, तलाठी हिंगोणा

दिवसेंदिवस जल पातळित घट होत असल्याने पाण्याची जलपातळी ४०० ते ५०० फुट खोल गेली असल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. आणि यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून पाणी घेतले आहे ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्र्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
– सत्यभामा शालिक भालेराव, हींगोणा सरपंच

Exit mobile version