Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राणा दाम्पत्याच्या घराजवळ ‘हायव्होल्टेज ड्रामा’ ! : शिवसैनिकांनी घेरले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा आपला निर्णय कायम ठेवला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शिवसैनिकांनी त्यांच्या घराला वेढा घातला असून यात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांचे निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याने त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, काल रात्रीपासूनच शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्री परिसरात उपस्थित झाले आहेत.
राणा दाम्पत्याच्या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रभर शिवसैनिकांनी मातोश्रीसमोर पहारा दिला. नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
तर राणा दाम्पत्यानीही त्याला प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगितलं. काही करून मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावर राणा ठाम आहेत. यानंतर कायदा सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी राणांच्या घरात दाखल झाले आहेत. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरप ोलिसांनी त्यांना घरीच रोखून धरले.

यानंतर राणा दाम्पत्याने आपल्या घरून व्हिडीओ जारी करून राज्य शासनावर आरोप केले आहेत. आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण मुख्यमंत्र्यांवर असणार आहे, असं रवी राणांनी स्पष्ट केलं आहे. कार्यकर्ते बोलावून आमच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी आम्ही हे करत असल्याचं राणांनी सांगितलंय.

Exit mobile version