Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरीट सोमय्यांना हायकोर्टाचा दिलासा : अटकेपासून संरक्षण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयएनएस विक्रांत या युध्दनौकेच्या नावाखाली अपहार केल्याच्या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलासा दिला आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपनेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतू न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता.

सत्र न्याायालयाच्या निर्णयाला किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्या यांचा जामीन काही अटी शर्थीवर मंजूर केला आहे.यात  अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश देण्यात आले असून सोमवार १८ एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिलेले आहेत. या कालावधीत त्यांना  दुपारी ११ ते २ दरम्यान पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.

 

Exit mobile version