Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा परिसरात भुरट्या चोरट्यांचा हैदोस

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नांद्रा तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष बाविस्कर यांच्या फार्महाऊसमधून पाण्याचे पीटर मशीन व इतर शेती अवजारे चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर गावात चांगलीच चर्चा रंगली असून या चोरांवर कारवाई कधी होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थितीत होत आहे.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे व परिसरात उन्हाळा सुरू झाल्यापासून गुरे ढोरं चोरीपासून तर चंदनाचे झाड चोरणे, पाण्याच्या मोटारी चोरणे, रस्त्यालगत असणारे कोल्ड्रिंक्स दुकान फोडणे, गावालगत घरातून घरात घुसून एल.ई.डी. (टी.व्ही.) चोरणे व आता तर चक्क तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांच्या गावा लगत असलेल्या पहान रस्त्यावरील फार्महाउस वरून शेतातील पाण्याचे पीटर मशीन व इतर शेती अवजार यामध्ये लोखंडे कोळपे, वखर, नागरटी चे इतर लोखंडी साहित्य साहित्य, घन कुलूप तोडून  चोरण्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त कधी होणार असे ग्रामस्थांमधून विचारणा होत आहे.

याबरोबरच गावोगावी ग्रामसुरक्षा दल स्थापन होऊनही ते कार्यान्वित कधी होणार पोलिस विभागाकडून त्यांना ओळखपत्र देऊन त्यांच्या जबाबदाऱ्या सांगण्यासाठी मार्गदर्शन कधी होणार ? याविषयी जनतेमधून विचारणा होत असून लोक व शेतकरी वर्ग पशुपालक हे भयभीत झाले आहेत. पाचोरा जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ विस्तीर्ण झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असते यामध्येच रस्त्यालगत असलेल्या अनेक घरांमधून या भुरट्या चोरांनी या अगोदरही डल्ला मारला आहे यामध्ये काही दिवसापूर्वी गुलाब बाविस्कर याच्या घराजवळून गाय व वासरू दोर कापून नेले सुरेश श्यामराव सूर्यवंशी यांची पेट्रोल पंप जवळील कोल्ड्रिंक्स टपरी तीन वेळा फोडली. त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या समाधान रेस्टॉरंट वाल्यांचे दोन बोकड चोरले. सुरेश शामराव यांची पाण्याची मोटर चोरली, गावालगत असलेले बालू  बाविस्कर यांचे घरातील रात्री दरवाजा उघडा असल्याने ते वसरीत गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेली ४३ इंच एल.ई.डी. (टी.व्ही.) रिमोट घरात घुसून लांबवले व आता खुद्द गावातील तंटे सोडणारे व वाद मिटवणारे नांद्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर यांचे पहान रोड लगत असलेल्या शेतात कुलूप तोडून फार्महाउस वरून पाण्याचे पिटर मशीन, वखर, कोळपे, विळे, खुरपे कुऱ्हाड, घन असे शेतात लागणारे सर्व लोखंडी अवजारे चोरट्यांनी लंपास केले आहेत याबरोबरच यापूर्वीही कुरंगी येथूनही अशाच प्रकार बाबादेव जवळून गाई चोराच्या घटना घडलेल्या आहेत तरी या भुरट्या चोरांना साठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन होणे व कार्यान्वित होणे गरजेचे असून पोलिसांनीही रात्रीची गस्त घालने आवश्यक आहे व त्या संदर्भात पोलिस पाटील यांच्या मीटिंग घेऊन प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल ओळखपत्र वाटप करून ते कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे आहे.

 

Exit mobile version