Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धानोरा बु ॥ येथे विवाहितेसह पतीला तिघांकडून मारहाण; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । अपशब्द बोलल्याचा जाब विचारल्याच्या राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करून काठीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. तालुका पोलीसात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता समाधान पारधी (वय-३०) रा. धानोरा बु ॥ ता.जि.जळगाव ह्या आपल्या कुटुंबियासह राहतात. शेतमजूरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. १८ मार्च रोजी रात्री ८ वाजता संगिता पारधी यांचा पुतण्या याला गावातील रामा साहेबवा पारधी याने विवाहितेविषयी अपशब्द बोलला. ही माहिती विवाहितेला सांगितली. आपल्याला अपशब्द का बोलला याचा जाब विचारल्याचा राग संशयित आरोपी रामा साहेबराव परधी याला आला. त्याने जवळ असलेली लाकडी काठीने विवाहितेच्या डोक्यात मारली. तर ईश्वर रामा पारधी आणि चेतन रामा पारधी यांनी विवाहितेच्या पती समाधान पारधी याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. विवाहितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Exit mobile version