Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढदिवसानिमित्त १० हजारांचा चेक देवून पूरग्रस्तांना मदत

yaval madat

यावल, प्रतिनिधी | येथील नगर परीषदचे माजी उपनगराध्यक्ष व विधमान नगरसेवक प्रा. मुकेश पोपटराव येवले यांचा आज (दि.१४) वाढदिवस आहे, त्यांनी सामाजीक बांधीलकीतुन आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला असुन, वाढ दिवसासाठी होणाऱ्या खर्चातील १० हजार रुपयांचा धनादेश पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रवीन्द्रभैय्या पाटील यांच्याकडे सूपुर्त केला आहे.

 

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे, ईंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे वसंत गजमल पाटील, कृउबाचे माजी संचालक दिनकर पाटील, राष्ट्रवादी आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, प्रा.जी.पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अ.करीम मन्यार, प्रफुल्ल कुलकर्णी, कामराज घारू, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, अॅड. निवृत्ती पाटील, ओ.बी. सेलचे एन.जी. धांडे, नावरे येथील सरपंच समाधान पाटील, काँग्रेसचे प्रविण घोडके, अय्युब शेख, पितांबर महाजन, भास्कर पाटील यांच्यासह त्यांची मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्राचा आत्मा असलेला कोकण क्षेत्र हा नैसर्गीक संकटात सापडले असुन आपल्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदघिकारी यांनी आपल्या कार्यक्रमांना होणारा खर्च टाळुन या राष्ट्रीय आपत्तीत त्यांच्या मदतीला उभे राहावे, असे आवाहन अॅड. पाटील यांनी यावेळी केले.

Exit mobile version