Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून शाळेला मदत

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलिंची निवासी शाळेला आकाश मनोहर वाणी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऑफिस कपाट भेट म्हणून दिले तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना केळी वाटप केली.

 

 

वाढदिवसाला व्यर्थ खर्च न करता श्री.आकाश वाणी यांनी आवश्यक तेथे मदतीचा हात दिला. त्यांनी सात हजार रुपये किमतीचे कपाट भेट दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केळीचे वाटप देखील केले. सामाजिक जाणिवेतून केलेल्या कार्याबद्दल श्री. वाणी यांचा सत्कार शाळेतील विशेष शिक्षक आर. एस. शेलकर यांनी  केला. तर उपस्थित मित्र परिवाराचे स्वागत विशेष शिक्षक एस. व्ही. भिल यांनी व मित्र परिवाराचे स्वागत आर. डी. महाजन यांनी केले. आभार एस. व्ही. भिल यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Exit mobile version