Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार ! दोन बेपत्ता, मोठी हानी

रावेर-शालीक महाजन एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | काल रात्रीपासून शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार उडाला असून नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला आहे. तर प्राथमिक माहितीनुसार यात दोन व्यक्ती वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे.

मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला आहे.पावसाने केलेल्या तांडवामुळे नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले असुन मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे.तसेच रसलपुर मध्ये चार गुरांचा मृत्यु झाले असुन बलेनो या मॉडेलची चारचाकी गाडी वाहून गेली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने नुकसानीची पाहणी केली आहे.

रावेर तालुक्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.अचानक पावसाने जोर पकडला. यानंतरदोन ते तीन तास मुसळधार पाऊसाने तांडव केला. यामुळे रावेर शहरातील नागझिरी नदी, मात्रान नदी,रसलपुर गाव नदी अचानक पाणी वाढले. नागझिरी नदीत एक व्यक्ती तर मात्रान नदित रावेर शहरातील एक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे. मोरव्हाल येथील अभोडा नदीत एक जणाचा मृत्यु झाला आहे. तर रसलपुर मध्ये बलेनो ही चार चाकी गाडी वाहून गेली असून गाडीत प्रवासी गाडीतुन उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहे. यासोबत रमजीपुर रसलपुर,खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुर मध्ये आलेल्या पुरानेमुळे चार गुरे वाहून गेले आहे.महसूल प्रशासन तालुक्यात अजुन कुठे नुकसान झाले आहे याचा शोध घेत आहे.

तहसीलदार बंडू कापसे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मदत कार्यात सहभाग घेतला आहे. रावेर शहरात माजी नगर सेवक सूरज चौधरी आपल्या टिमसह महसूल प्रशासना सहकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.तर रमजीपुर मध्ये सरपंच प्रकाश तायडे उपसरपंच योगिता कावडकर प्रा उमाकांत महाजन नागरीकांना मदत करत आहेत.

Exit mobile version