Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रासायनिक खतांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कंपनीच्या तीन जणांविरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बिलखेडा शिवारातील शेतात असलेल्या कापसाच्या पिकावर सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमीकल कंपनीचे रासायनिक खत मारल्याने शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान होवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ९ ऑक्टोबर रेाजी दुपारी ४ वाजता  कंपनीच्या जबाबदार तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक असे की, सुकलाल बंडू भदाणे (वय-६५) रा. बिलखेडा ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे बिलखेडा शिवारातीलशेत गट नंबर २०५ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापसाच्या वाढीसाठी त्यांनी २५ जुलै रोजी सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमिकल कंपनीचे खत कापसाच्या पिकांवर मारले होते. या रासायनिक खतामुळे सुकलाल भदाणे यांच्या कापसाच्या पिकांचे नुकसान होवून सहा लाखांचे नुकसान झाले आहे. कंपनीने दिलेल्या खतामुळेच पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी पोलीसात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंपनीच्या जबाबदार व्यक्ती ओम धर्मेशभाई वैष्णव , धर्मेशभाई मोहनभाई वैष्णव, जयश्रीबेन धर्मेशभाई वैष्णव तिघे रा. राजकोट, गुजरात यांच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.

 

Exit mobile version