उष्णतेची लाट कायम राहणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट ही अजून काही दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सर्वच जण प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाला असताना हवामान विभागाने आणखी चिंता वाढविणारी बातमी दिली आहे. महाराष्ट्रातील विदर्भासह काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला असून यात विदर्भातील ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात आज सकाळी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांसह सामान्य नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content