जिल्हाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला आरोग्यदायी लसीचे बुस्टर गिफ्ट

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयात आज ‘फ्रंटलाईन वर्कस्’ यांना ‘बूस्टर डोस’ लसीकरणाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. योगायोगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला आरोग्यदायी लसीचे बुस्टर गिफ्ट मिळाले.

जळगाव जिल्हा रुग्णालयात आज ‘फ्रंटलाईन वर्कस्’ यांना ‘बूस्टर डोस’ लसीकरणाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना लसीचा बुस्टर डोस घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत वेळेवर कोविड लसीकरण करण्याचा आदर्श संदेश दिला.

जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आज सोमवार, दि.१० जानेवारी रोजी जिल्ह्यात ८० बाधित रुग्ण आढळले असून सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधित रुंगांच्या संख्या पाचशेच्या पार जात ५५२ इतकी झालेली आहे. त्यामुळे याबाबत अधिक जागरूक राहत कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.

जागरूक राहण्यासाठी सतत आवाहन करणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या वाढदिवसाला कोरोना लसीचा बुस्टर डोस घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत वेळेवर कोविड लसीकरण करण्याचा आदर्श संदेश दिला.

Protected Content