Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर (व्हिडीओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेटावद खुर्द येथे वि.जे.एन.टी. सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांच्या माध्यमातून वाघारी बेटावर गटातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ६४५ रुग्णांनी घेतला लाभ घेतला.

बेटावद खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष विलास राजपूत, व्ही.जे.एन.टी. सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चीतोडीया, जीवन बर्डे, अनिल पाटील, संजू राजपूत, रणजीत राजपूत, पंडित बारबुडे, दिलीप डोंगरे, राहुल गायकवाड, उमेश सोनवणे, दीपक माथडे, संजय खवडे, योगेश कापसे, उमेश आहेर, गोपाल सातपुते, राहुल राजपूत, अमोल पाटील, जीवन चौधरी, पराग नेरकर, गोपाल ढोले, सुभाष दवंगे यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची यावेळी उपस्थिती होती.

 

Exit mobile version