राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मुख्याध्यापक सुनिल माळी सन्मानित

यावल प्रतिनिधी । येथील बालसंस्कार विद्या मंदीरचे मुख्याध्यापक सुनिल माळी यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे दि.१० ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते बाल संस्कार विद्या मंदिर,यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कृष्णाजी माळी सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० – २१ देण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२० – २१ राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि.१०/१०/२०२१ रविवार रोजी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मान्यवर साहित्यिक अ. फ. भालेराव, मिनाक्षी चव्हाण अध्यक्षा सिंगल वुमन फाऊंडेशन, विलाससिंह पाटील कार्याध्यक्ष, राजपूत करणी सेना, लोक कलावंत गणेश अमृतकर, जिल्हा उपाध्यक्ष जी.एच. खंडाळकर, संस्था अध्यक्षा संदीपा वाघ, एस.आर.वाघ सेवानिवृत्त मुख्याध्यापक सानेगुरुजी विद्या मंदिर,यावल यांचे उपस्थीतीत बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनिय कार्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण केल्याबद्दल सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले.

माळी सर यांना राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश वाणी व सर्व संचालक मंडळ, तसेच बाल संस्कार शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

 

Protected Content