Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर धडक; ५ जण गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील जैन कंपनीसमोर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकी यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही वाहनांवरील ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ६ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून प्रवाशी रिक्षा भरून जळगाव शहराकडे निघाली असतांना जैन कंपनीसमोरील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशी रिक्षा आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वारसह रिक्षाचालक आणि तीन प्रवाशी असे एकुण ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली. हा अपघात घडल्यानंतर जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version