Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आई बापाची सेवा करणाऱ्याला देवत्व प्राप्त होते – अशोकदास महाराज

चोपडा प्रतिनिधी । आई बापाची सेवा करणाऱ्याला देवत्व प्राप्त होते, असे ह.भ.प. अशोकदास महाराज म्हणाले, ते संत श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने समस्त तेली समाजातर्फे श्रीमद् भागवत कथा व किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ते यावेळी बोलत होते. 

भागवत कथेवर निरूपण करताना अशोक दास जी महाराज यांनी सांगितले की ,आई बाप हेंच देवाचीच रूपे आहेत. आई वडीलाची सेवा करा .श्रावण बालाचि गोष्ट सांगून आई वडीलांची महती वर्णन केली. श्रावण बाळाला देवत्व प्राप्त झाले. असे देवत्व प्राप्त करण्यासाठी आई वडीलांची सेवा करा असे सांगून हृदय स्पर्शी अनेक कथा महाराजांनी सांगितल्या. यावेळी राधाकृष्णाची झाकी आकर्षण ठरले. सुरवातीला सन्स्थेचे अध्यक्ष के.डी. चौधरी यांनी स्वागत केले. कथेचे संयोजक ह्.भ.प्.बापू महाराज ,सह संयोजक ह्.भ.प्.गोपिचन्द् महाराज,, ह्.भ.प्.ज्ञानोबा महाराज ,ह्.भ.प्.वितोबा महाराज,, देवकांत के चौधरी, महेंद्र चौधरी, प्रशांत चौधरी, नारायण चौधरी ,गोकुळ चौधरि, उपाध्यक्ष टी. एम. चौधरी, गुलाब चौधरी ,आदी कार्यकर्ते उपस्थित हाेते. सूर्यकांत चौधरी यांनी आभारही मानले.

Exit mobile version