Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय विद्यालयासमोरू अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. चाळीसगाव शहरातील राष्ट्रीय विद्यालयासमोर मुलगी ९ सप्टेंबर रेाजी दुपारी १ वाजता कामानिमित्त आली होती. दुपारी १ ते २.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मुलीचे फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढिकले करीत आहे.

Exit mobile version