Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अॅड.सदावर्तेंसह यांना जामीन नाही; हल्ल्यामध्ये सदावर्तेंचा हात दोघांची कबुली

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्या केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर चार आरोपींचा जामीन गिरगाव न्यायालयाने फेटाळला आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह राम कातकडे, सचितानंद पुरी, रमेश गोरे आणि संकेत नेहरकर यांचा जामीन गिरगाव न्यायालयाने फेटाळला आहे. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या हल्ल्यामध्ये या हल्ल्यामध्ये आपला काही संबंध नसून सदावर्तेंचा हात असल्याचं कबुल केलं.

गिरगाव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी तर आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना मंगळवार, दि.१९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या हल्ल्याप्रकरणातील ११५ आरोपी सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार आहेत.

Exit mobile version