Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळेच्या खोलीचे कुलूप तोडून मुद्देमाल लांबविला

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली सार्वजनिक माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी शालेय साहित्य, केबल वायर, पाण्याची मोटारीसह इतर साहित्याची चोरी केल्याचे १६ जून रोजी उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “यावल तालुक्यातील चिंचोली येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. बुधवार १५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सर्व शिक्षकांनी शाळेचे कामकाज आटोपून झाल्यानंतर शाळा बंद करून घरी गेले.

दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेतील खोल्याचे कडी कोयंडा आणि कुलूप तोडून आप प्रवेश करत शालेय साहित्य, पाण्याची मोटार, इलेक्ट्रीक केबल, दोन ग्राईंडर मशीनीसह आदी सामान असा एकूण ३६ हजार ६३० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवार १६ जून रोजी सकाळी उघडकीला आली आहे.

याबाबत उपशिक्षक रविंद्र पुरूषोत्तम रावते (वय-५५) रा. किनगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version